वारकऱ्यांच्या सन्मानासाठी विश्व हिंदू परिषदेचे लोकप्रतिनिधींना निवेदन !
जय श्रीराम ! विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने, पंढरपूरच्या आषाढी वारी आणि राज्यसरकारची दडपशाही याबाबत, भारतीय जनता पक्ष पुणे शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. सचिन मोरे, यांना निवेदन देण्यात आले. वारकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करून, विश्व हिंदू परिषदेची वारकऱ्यांप्रती असणारी तळमळ, या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. खडकवासला मतदार संघाचे लोकप्रतिनिधी या भूमिकेतून सदर निवेदन विद्यमान आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांना देण्यात येणार होते, परंतु ते सध्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांच्या वतीने, मा. सचिन मोरे यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत चर्चा करताना, मा. श्री. जगदीश मुळीक यांनी आपले वडील देखील वि हीं प चे कार्य करायचे असे सांगत आठवणींना उजाळा दिला. मा. जगदीश मुळीक आणि मा. सचिन मोरे यांनी, विश्व हिंदू परिषदेच्या वारकरी संप्रदायाबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेचा सन्मान केला. विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.