Posts

Showing posts with the label उत्सव-समारंभ

हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित समरसता यज्ञ.

Image
  श्रावणमास आणि वर्धापन दिन निमित्त विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित जप महायज्ञाला प्रचंड प्रतिसाद.   संकल्प पूर्ती निमित्त समरसता यज्ञ संपन्न.  विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने श्रावण मास आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हिंगणे येथील पुरातन अश्या चक्रेश्र्वर महादेव मंदिरात ओम् नमः शिवाय या मंत्राचा सव्वा कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आला होता. दि २६ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीत रोज सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत परिसरातील  हजारो भक्तांनी जप सेवा केली. भक्तगण आपल्या वेळेनुसार मंदिरात उपस्थित राहून ही सेवा करत होते. प्रत्येक श्रावणी सोमवारी, विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतीश गोरडे, तसेच रा स्व संघ सिंहगड भाग कार्यवाह मंगेश पाटील यांच्या हस्ते विशेष महाआरती करण्यात आली. श्रावण मास समाप्ती दिनी समरसता यज्ञ संपन्न करण्यात आला.  श्रावण अमावास्येला पहाटे ६:०० वाजले पासून या यज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. लघुरुद्र, मंदिर परिसरातील देवतांचे षोडशोपचारे पूजन आणि यज्ञ आह...

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

Image
  ।। जय श्रीराम ।। पुणेः-  विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'मेळा गोभक्तांचा'  या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.  यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती  विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे संयोजक सीए महेंद्र देवी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन होणार आहे.  या कार्यक्...

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धायरीत दिपोत्सव.

Image
दि. ७ नोव्हेंबर २०२१.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धायरी येथे देशपांडे राममंदिरामध्ये, विश्व हिंदू परिषद धायरी प्रखंडाच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  धायरी येथील मते नगरमध्ये, देशपांडे कुटुंबीयांनी प्रशस्त आणि देखणे श्रीराम मंदिर उभारले आहे.  या मंदिरामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, माता सिता आणि हनुमंत याच बरोबर, गणपती तसेच मल्हारी मार्तंड (खंडोबा), यांच्या सुबक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या मंदिरामध्ये नित्य पूजा तसेच चंपाषष्ठी, श्रीराम नवमी यांसारखे धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जात असतात.  दिपावलीच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी धायरी प्रखंडच्या माध्यमातून महाआरती आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  प्रारंभी त्रिवार ओंकार, श्रीरामनामाचा  विजय मंत्र आणि श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. याच दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती, श्लोक पठण करण्यात आले. चि. अथर्व बोत्रे यांनी बासरीवादन तर कु.आराध्या गडे यांनी शंख वादन करून भक्तगणांना म...

सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.

Image
  ।। जय श्रीराम ।। पारंपरिक पद्धतीने औक्षण करताना कष्टकरी भगिनी  दि. ३१ ऑक्टॉ. २०२१, रविवार, स्थळ : धारेश्वर बँक्वेट हॉल, धायरी. : विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग यांच्या वतीने, कष्टकरी महिलांची दिवाळी गोड व्हावी याकरता  समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात आला होता.  या उपक्रमांअंतर्गत, १०१ कष्टकरी भगिनींना , फराळ बनवण्याचे साहित्य, अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे, तेल आणि साबण, त्याच प्रमाणे पणत्या आणि आकाशकंदील इ साहित्य भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात आले.  त्रिवार ओंकार आणि श्रीराम नामाचा जप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जगताप म्हणाले की;  "समाजासाठी समाजाच्या माध्यमातून राबवलेला हा एक सामाजिक उपक्रम आहे.  समाजातील अनेक मंडळींचा याला हातभार लागला आहे. " या कार्यक्रम प्रसंगी बोलताना, भाग संघचालक श्री. महेश लेले म्हणाले की;  " या उपक्रमात कोणी याचक किंवा दाता अश्या भूमिकेतून सहभागी झाले नसून, ही...

समंत्रक अभिषेक-पूजन करून, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा.

Image
  ।। जय श्रीराम ।। हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय...  छत्रपती शिवाजी महाराज की जय...... जय श्रीराम ..... चा अखंड जयघोष...   अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह अभिषेक करुन सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत, श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.  विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, प्रतिवर्षी हा सोहळा; किल्ले सिंहगड येथे आयोजित केला जातो. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा पुणे शहरात घेण्यात आला.  यावेळी, छत्रपती शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच, शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत, संगीत आणि वीर रसानेयुक्त असणारे, सुश्राव्य व्याख्यान झाले. ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महा...