Posts

Showing posts with the label प्रबोधन

हिजाबचे झाले पण हर्षा बजरंगीच्या हत्येचे काय ?

Image
  हिजाब परिधान करणे हे इस्लाममध्ये अनिवार्य नाही :  कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय.  कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  त्या याचिकेवर सुनावणी करताना,  हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकऱणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. आता प्रश्न असे आहेत की; याच हिजाब प्रकरणासाठी हत्या झालेल्या हर्षा बजरंगी यांच्या कुटुंबियांना आता तरी न्याय कोण देणार ? काहीही केले तरी हर्षा बजरंगी परत येणार का ? इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे हर्षा बजरंगी प्रकरणात बुडात शेपूट घालून का बसले आहेत  ? " हिजाब गर्ल " या नावाने प्रसिद्धीत आलेल्या मुस्कान नावाच्या मुलीचा; काही मंडळी अजूनह...

राजद्रोही : सेंट व्हॅलेंटाईन

Image
  १४ फेब्रुवारी म्हटलं की; पौगंडावस्थेतील युवांमध्ये एक वेगळीच भावना उत्पन्न होते.  हा दिवस बऱ्याच भागांतून " प्रेमिकांचा दिवस " म्हणून साजरा केला जातो.  या दिवशी व्यक्त केले किंवा मिळालेले प्रेम हे अमर असते अशी काहीशी धारणा आजकाल झालेली दिसते.  प्रसारमाध्यमे देखील या दिवसाचा " प्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी " अश्या शब्दात गवगवा करताना दिसतात आणि म्हणूनच हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी भेट वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करणे असे काहीसे याचे स्वरूप आहे. आणि म्हणूनच ज्या सेंट वॅलेन्टाईनचा कसलाही संबंध नसणाऱ्या भारतासारख्या देशात या दिवसाच्या नावाखाली करोडोंची उलाढाल होते.  हा दिवस साजरा करणाऱ्या बहुतेक जणांना कोण बाबा हा " सेंट व्हॅलेंटाईन " हे देखील माहित नसते. आम्हाला देखील हा प्रश्न पडला आणि मग इंटरनेटवर याचा शोध घेतला.  वेगवेगळ्या ठिकाणी याचा शोध घेतल्यावर एकाच स्वरूपाची माहिती समोर आली आणि तीच माहिती आम्ही आपणापुढे मांडत आहोत.  हा सेंट व्हॅलंटाईन तिसऱ्या शतकामध्ये रोम च्या एका चर्चचा पुजारी (प्राइस्ट) होता. रोमचा ...

आई-बाबा हेच नाताळ बाबा

Image
      रस्त्यावरती लाल टोप्या विकायला आलेल्या दिसल्या की ओळखावे २५ डिसेंबर जवळ आलाय.  हाच तो दिवस ज्याला नाताळ, ख्रिसमस असे संबोधले जाते. येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस म्हणजे ख्रिसमस होय. आजकाल याच दिवशी कोणीतरी एक लाल कपडे आणि टोपी घालून, पांढऱ्या दाढी मिश्या वाढवलेला, गुबगुबीत कपोल कल्पित मनुष्य रात्रीतून येतो आणि लहान मुलांना खेळण्या किंवा त्या लहान मुलाच्या इच्छेनुसार काहीही देतो अशी कहाणी वर्षानुवर्षे प्रचलित आहे. तिकडे पाश्चिमात्य देशात रस्त्यांवरून असे डमी नाताळबाबा खेळण्या वाटत असतात म्हणे ! इथे पुण्यात देखील कॅम्प भागात असे प्रकार घडतात म्हणे !! अगदी लहानपणापासून ऐकत आलेला हा सांता क्लोज किंवा नाताळ बाबा म्हणजे कोण ? हा कोणात्या देवाचा अवतार ? हा प्रश्न आजच्या कथित विज्ञानवादी पिढीला पडत नाही याचेच आश्चर्य वाटते. थोडा बहुत इंटरनेटवर  शोध घेतला तेंव्हा असे समजले की; हे एक पात्र (कॅरॅकटर) आहे. युरोपियन ख्रिश्चन संकल्पनेतून साकारलेले एक कपोल कल्पित पात्र . साधारणपणे १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पात्र सांता क्लोज या नावाने इंग्रजी बोलत नसणाऱ्या प्रदेशांसाठ...