सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.
।। जय श्रीराम ।। पारंपरिक पद्धतीने औक्षण करताना कष्टकरी भगिनी दि. ३१ ऑक्टॉ. २०२१, रविवार, स्थळ : धारेश्वर बँक्वेट हॉल, धायरी. : विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग यांच्या वतीने, कष्टकरी महिलांची दिवाळी गोड व्हावी याकरता समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमांअंतर्गत, १०१ कष्टकरी भगिनींना , फराळ बनवण्याचे साहित्य, अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे, तेल आणि साबण, त्याच प्रमाणे पणत्या आणि आकाशकंदील इ साहित्य भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात आले. त्रिवार ओंकार आणि श्रीराम नामाचा जप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जगताप म्हणाले की; "समाजासाठी समाजाच्या माध्यमातून राबवलेला हा एक सामाजिक उपक्रम आहे. समाजातील अनेक मंडळींचा याला हातभार लागला आहे. " या कार्यक्रम प्रसंगी बोलताना, भाग संघचालक श्री. महेश लेले म्हणाले की; " या उपक्रमात कोणी याचक किंवा दाता अश्या भूमिकेतून सहभागी झाले नसून, ही...