सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.
।। जय श्रीराम ।।
पारंपरिक पद्धतीने औक्षण करताना कष्टकरी भगिनी
दि. ३१ ऑक्टॉ. २०२१, रविवार, स्थळ : धारेश्वर बँक्वेट हॉल, धायरी. :
विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग यांच्या वतीने, कष्टकरी महिलांची दिवाळी गोड व्हावी याकरता समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात आला होता.
या उपक्रमांअंतर्गत, १०१ कष्टकरी भगिनींना, फराळ बनवण्याचे साहित्य, अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे, तेल आणि साबण, त्याच प्रमाणे पणत्या आणि आकाशकंदील इ साहित्य भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात आले.
त्रिवार ओंकार आणि श्रीराम नामाचा जप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जगताप म्हणाले की;
"समाजासाठी समाजाच्या माध्यमातून राबवलेला हा एक सामाजिक उपक्रम आहे. समाजातील अनेक मंडळींचा याला हातभार लागला आहे. "
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना, भाग संघचालक श्री. महेश लेले म्हणाले की;
" या उपक्रमात कोणी याचक किंवा दाता अश्या भूमिकेतून सहभागी झाले नसून, ही एका हिंदू भावाकडून एका हिंदू बहिणीला दिलेली ओवाळणी आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांच्या कुटुंबात आनंद निर्माण करणे हा आपला धर्म आहे."
यानंतर विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत मंत्री श्री. संजय मुरदाळे म्हणाले की; " न हिंदू पतितो भवेत या उक्ती नुसार कोणताही हिंदू कोणत्याही स्तरावर वंचित राहणार नाही या साठी संघटनेची अनेक सेवा कार्ये भारतभर सुरु असतात. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन व्यतीत करता यावे या साठी विश्व हिंदू परिषद कटीबद्ध आहे."
या नंतर विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत अध्यक्ष, श्री. पांडुरंग राऊत यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून,
" सारे हिंदू हे एकच असून ते आता समरस झाले झाले पाहिजेत याकरता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे" असे प्रदीपादन केले.
या कार्यक्रमास, वरील मान्यवरांसोबतच, मंगेश पाटील, मनोहर ओक, तुषार कुलकर्णी, विजय राजपूत, दादासाहेब चाकणकर, अतुल चाकणकर, धनंजय गायकवाड, समीर रुपदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता परिसरातील, गणेश मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, शिवजयंती मंडळे, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कष्टकरी भगिनींनी, उपस्थित मान्यवरांना औक्षण करून भाऊबिजेची ओवाळणी म्हणून वरील साहित्य स्वीकारले.
त्याचप्रमाणे विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनींना देखील ही भाऊबीज पाठवण्यात आली आहे. भोई प्रतिष्ठानचे; श्री. मिलिंद भोई यांनी, ही भाऊबीज स्विकारली.
सौ.अश्विनी गडे यांनी आभार प्रदर्शन केले. तर सौ. चारुता कडुरकर आणि कु. देविका सराफ यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीच्या सिंहगड भागातील सर्व महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कष्टकरी भगिनींचा सन्मान करणाऱ्या आणि त्यांची दिवाळी गोड करणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल समाजातील विविध स्तरातून, कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.
कार्यक्रम नियोजन समितीतील सदस्य
द्वारा : प्रचार विभाग, विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग
Comments
Post a Comment