Posts

Showing posts from November, 2021

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

Image
  ।। जय श्रीराम ।। विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.  यंदाही रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी, सकाळी ९ : ०० ते ३:०० पर्यंत, एकूण ११ रक्तदान केंद्रावर हे शिबीर संपन्न होणार आहे.  हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू, सिमेवरील हुतात्मा सैनिक आणि शौर्य दिनाच्या स्मरणार्थ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत असते.  रक्तदान महायज्ञ केंद्र, पत्ते आणि संपर्क क्र.  ################################################################################# केंद्र : 1.   हिंगणे  पत्ता : कै.हनुमंतराव जगताप प्रशाला (मनपा) हिंगणे खुर्द, पुणे-५१ संपर्क : महेश चिलमे : 8669697070 , निलेश निवळकर : 9371020365 ################################################################################## केंद्र :2.  आनंद नगर  पत्ता : आनंद मारुती मंदिर, आनंद नगर, सिंहगड रस्ता पुणे.  संपर्क :- केतन घोडके : 9921111116, सर्वेश नातू : 9922016999 ###########################################################################...

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

Image
  ।। जय श्रीराम ।। पुणेः-  विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'मेळा गोभक्तांचा'  या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.  यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती  विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे संयोजक सीए महेंद्र देवी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन होणार आहे.  या कार्यक्...

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धायरीत दिपोत्सव.

Image
दि. ७ नोव्हेंबर २०२१.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धायरी येथे देशपांडे राममंदिरामध्ये, विश्व हिंदू परिषद धायरी प्रखंडाच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  धायरी येथील मते नगरमध्ये, देशपांडे कुटुंबीयांनी प्रशस्त आणि देखणे श्रीराम मंदिर उभारले आहे.  या मंदिरामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, माता सिता आणि हनुमंत याच बरोबर, गणपती तसेच मल्हारी मार्तंड (खंडोबा), यांच्या सुबक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या मंदिरामध्ये नित्य पूजा तसेच चंपाषष्ठी, श्रीराम नवमी यांसारखे धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जात असतात.  दिपावलीच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी धायरी प्रखंडच्या माध्यमातून महाआरती आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  प्रारंभी त्रिवार ओंकार, श्रीरामनामाचा  विजय मंत्र आणि श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. याच दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती, श्लोक पठण करण्यात आले. चि. अथर्व बोत्रे यांनी बासरीवादन तर कु.आराध्या गडे यांनी शंख वादन करून भक्तगणांना म...