विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धायरीत दिपोत्सव.





दि. ७ नोव्हेंबर २०२१. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धायरी येथे देशपांडे राममंदिरामध्ये, विश्व हिंदू परिषद धायरी प्रखंडाच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

धायरी येथील मते नगरमध्ये, देशपांडे कुटुंबीयांनी प्रशस्त आणि देखणे श्रीराम मंदिर उभारले आहे. 

या मंदिरामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, माता सिता आणि हनुमंत याच बरोबर, गणपती तसेच मल्हारी मार्तंड (खंडोबा),

यांच्या सुबक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

या मंदिरामध्ये नित्य पूजा तसेच चंपाषष्ठी, श्रीराम नवमी यांसारखे धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जात असतात. 

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी धायरी प्रखंडच्या माध्यमातून महाआरती आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 

प्रारंभी त्रिवार ओंकार, श्रीरामनामाचा  विजय मंत्र आणि श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. याच दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती, श्लोक पठण करण्यात आले. चि. अथर्व बोत्रे यांनी बासरीवादन तर कु.आराध्या गडे यांनी शंख वादन करून भक्तगणांना मुग्ध केले.

विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या मठ मंदिर संपर्क विभागातर्फे, मंदिराच्या ट्रस्टी श्रीमती देशपांडे यांना भगवा धर्मध्वज देण्यात आला. 

दुर्गा वाहिनीच्या सौ.मानसी मराठेआणि कु. दर्शनी देशपांडे यांच्या पसायदान गायनाने उत्सवाचा समारोप करण्यात आला. 

या कार्यक्रमाप्रसंगी, विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप, उपाध्यक्षा श्रीमती गोडबोले, प्रखंड मंत्री उमेश गडे, प्रखंड समितीचे सचिन गुळाणीकर आणि सिंहगड भागाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता धायरी प्रखंडातील सर्व कार्यकर्ते, मंदिरातील पुजारी वर्ग आणि ट्रस्टी यांनी परिश्रम घेतले. 

श्लोक, स्तोत्रे आणि संगीत यामुळे सात्विक वातावरणाची निर्मिती करणारा हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल, उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. 



देशपांडे श्रीराम मंदिर धायरी


                         


                         



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

आई-बाबा हेच नाताळ बाबा