राजद्रोही : सेंट व्हॅलेंटाईन
१४ फेब्रुवारी म्हटलं की; पौगंडावस्थेतील युवांमध्ये एक वेगळीच भावना उत्पन्न होते. हा दिवस बऱ्याच भागांतून " प्रेमिकांचा दिवस " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यक्त केले किंवा मिळालेले प्रेम हे अमर असते अशी काहीशी धारणा आजकाल झालेली दिसते. प्रसारमाध्यमे देखील या दिवसाचा " प्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी " अश्या शब्दात गवगवा करताना दिसतात आणि म्हणूनच हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी भेट वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करणे असे काहीसे याचे स्वरूप आहे. आणि म्हणूनच ज्या सेंट वॅलेन्टाईनचा कसलाही संबंध नसणाऱ्या भारतासारख्या देशात या दिवसाच्या नावाखाली करोडोंची उलाढाल होते. हा दिवस साजरा करणाऱ्या बहुतेक जणांना कोण बाबा हा " सेंट व्हॅलेंटाईन " हे देखील माहित नसते. आम्हाला देखील हा प्रश्न पडला आणि मग इंटरनेटवर याचा शोध घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी याचा शोध घेतल्यावर एकाच स्वरूपाची माहिती समोर आली आणि तीच माहिती आम्ही आपणापुढे मांडत आहोत. हा सेंट व्हॅलंटाईन तिसऱ्या शतकामध्ये रोम च्या एका चर्चचा पुजारी (प्राइस्ट) होता. रोमचा ...