Posts

Showing posts from March, 2022

हिजाबचे झाले पण हर्षा बजरंगीच्या हत्येचे काय ?

Image
  हिजाब परिधान करणे हे इस्लाममध्ये अनिवार्य नाही :  कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय.  कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  त्या याचिकेवर सुनावणी करताना,  हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकऱणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. आता प्रश्न असे आहेत की; याच हिजाब प्रकरणासाठी हत्या झालेल्या हर्षा बजरंगी यांच्या कुटुंबियांना आता तरी न्याय कोण देणार ? काहीही केले तरी हर्षा बजरंगी परत येणार का ? इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे हर्षा बजरंगी प्रकरणात बुडात शेपूट घालून का बसले आहेत  ? " हिजाब गर्ल " या नावाने प्रसिद्धीत आलेल्या मुस्कान नावाच्या मुलीचा; काही मंडळी अजूनही सत्कार करणार का ?