समंत्रक अभिषेक-पूजन करून, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा.
।। जय श्रीराम ।। हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय... छत्रपती शिवाजी महाराज की जय...... जय श्रीराम ..... चा अखंड जयघोष... अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह अभिषेक करुन सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत, श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, प्रतिवर्षी हा सोहळा; किल्ले सिंहगड येथे आयोजित केला जातो. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा पुणे शहरात घेण्यात आला. यावेळी, छत्रपती शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच, शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत, संगीत आणि वीर रसानेयुक्त असणारे, सुश्राव्य व्याख्यान झाले. ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महा...