निसर्ग संवर्धनासाठी सरसावले बजरंगी
।। जय श्रीराम ।।
दि. १३-जून-२०२१ :
निसर्गाचे संवर्धन आणि विशेष करून वृक्षसंवर्धनाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
सनातन हिंदू संस्कृती ही नेहमीच निसर्ग पूजन सांगत आली आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन, नारळी पौर्णिमेला समुद्राचे पूजन, कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे पूजन, तर मकर संक्रातीला सूर्याचे पूजन आदी सण निसर्ग पूजनाचाच संदेश देतात.
एवढेच नव्हे तर, " पादस्पर्शे क्षमस्व मे " असे म्हणत प्रातःस्मरणात या धरित्री मातेची क्षमा मागण्याचे संस्कार देखील याच संस्कृतीत केले जातात.
जगतगुरु तुकोबारायांनी तर,वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असे म्हणत, निसर्गाशी सोयरिकच जोडली आहे.
हीच संस्कृती, परंपरा पुढे चालवण्यासाठी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने,
स्वामी नारायण मंदिरा मागील (नऱ्हे) टेकडीवर वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन उपक्रम राबवण्यात आला.
याच टेकडीवर गेली तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या, झाडे लावा झाडे जगवा या संस्थेच्या माध्यमांतून हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमा अंतर्गत, २०० तुळसीच्या रोपांची लागवड करून वृक्ष संवर्धानासाठी १००० किलो गांडूळखत, संस्थेला भेट देण्यात आले.
हा उपक्रम पार पाडण्याकरिता, झाडे लावा झाडे जगवा संस्थेचे डॉ.अहिरे आणि श्री. बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाला, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री मा. दादा वेदक यांनी उपस्थित राहून सर्व तरुणाईचे कौतुक केले.
प्रारंभी डॉ. अहिरे यांनी, सध्या सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली, त्यानंतर २०० तुलसी रोपांसह काही मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली, मा. दादा वेदक यांनी नामसंकीर्तनाने कार्यक्रमाची सांगता केली.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे ६० बजरंगी (कार्यकर्ते) आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर विश्व हिंदू परिषद नर्हे प्रखंडातील कार्यकर्ते, श्री.भूषण विसपुते आणि अमोल सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
एक पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल, सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment