समंत्रक अभिषेक-पूजन करून, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा.

 

।। जय श्रीराम ।।


हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय... 

छत्रपती शिवाजी महाराज की जय......

जय श्रीराम ..... चा अखंड जयघोष...  

अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह अभिषेक करुन सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत, श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. 

विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, प्रतिवर्षी हा सोहळा; किल्ले सिंहगड येथे आयोजित केला जातो. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा पुणे शहरात घेण्यात आला. 

यावेळी, छत्रपती शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

तसेच, शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत, संगीत आणि वीर रसानेयुक्त असणारे, सुश्राव्य व्याख्यान झाले.

ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी व त्यांचे सहकारी सरदार, मावळे यांनी मोठा पराक्रम गाजवून अनेक गड-किल्ले स्वराज्यात आणले. त्यांच्या पराक्रमाची आठवण ठेवत श्री शिवराज्याभिषेकासारखे कार्यक्रम तारखेने न साजरे करता, आपल्या संस्कृतीनुसार तिथीने साजरे करायला हवेत. तसेच तरुण पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करुन देत इतिहास देखील सांगायला हवा.

अभिवादन समितीचे प्रमुख समनव्ययक, किशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ रायगडावर न साजरा करता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच गड-किल्ल्यांवर साजरा व्हायला हवा ! गेली दोन वर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच हा सोहळा साधेपणाने व प्रातिनिधीक स्वरुपात होत आहे. पुढील वर्षी पुन्हा एकदा जोमाने शिवप्रेमी हा सोहळा सिंहगडावर साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, संजय मुरदाळे, रा.स्व.संघाचे सिंहगड भागाचे संघचालक महेश लेले, कार्यवाह मंगेश पाटील, समितीचे प्रमुख समनव्ययक किशोर चव्हाण, तुषार कुलकर्णी, श्रीकांत चिल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

हा सोहळा यशस्वी होण्याकरता, केतन घोडके, समीर रुपदे, धनंजय गायकवाड, नितीन महाजन, नाना क्षीरसागर, अमर सातपुते, साईनाथ कदम, राजू कुडले, योगेश देशपांडे, सचिन कांबळे, निलेश निवळकर, सचिन लोखरे उपस्थित होते. आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

श्रीपाद श्रीकांत रामदासी यांनी सोहळ्याचे सूत्र संचालन तर समितीचे सह-समनव्ययक शरद जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे फेसबुक आणि युट्युब च्या माध्यमातून प्रक्षेपण देखील करण्यात आले. 

पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा केल्याबद्दल, सर्व कार्यकर्त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


Comments

Popular posts from this blog

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

आई-बाबा हेच नाताळ बाबा

सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.