आई-बाबा हेच नाताळ बाबा
रस्त्यावरती लाल टोप्या विकायला आलेल्या दिसल्या की ओळखावे २५ डिसेंबर जवळ आलाय.
हाच तो दिवस ज्याला नाताळ, ख्रिसमस असे संबोधले जाते. येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस म्हणजे ख्रिसमस होय.
आजकाल याच दिवशी कोणीतरी एक लाल कपडे आणि टोपी घालून, पांढऱ्या दाढी मिश्या वाढवलेला, गुबगुबीत कपोल कल्पित मनुष्य रात्रीतून येतो आणि लहान मुलांना खेळण्या किंवा त्या लहान मुलाच्या इच्छेनुसार काहीही देतो अशी कहाणी वर्षानुवर्षे प्रचलित आहे.
तिकडे पाश्चिमात्य देशात रस्त्यांवरून असे डमी नाताळबाबा खेळण्या वाटत असतात म्हणे ! इथे पुण्यात देखील कॅम्प भागात असे प्रकार घडतात म्हणे !!
अगदी लहानपणापासून ऐकत आलेला हा सांता क्लोज किंवा नाताळ बाबा म्हणजे कोण ? हा कोणात्या देवाचा अवतार ? हा प्रश्न आजच्या कथित विज्ञानवादी पिढीला पडत नाही याचेच आश्चर्य वाटते.
थोडा बहुत इंटरनेटवर शोध घेतला तेंव्हा असे समजले की; हे एक पात्र (कॅरॅकटर) आहे. युरोपियन ख्रिश्चन संकल्पनेतून साकारलेले एक कपोल कल्पित पात्र.
साधारणपणे १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पात्र सांता क्लोज या नावाने इंग्रजी बोलत नसणाऱ्या प्रदेशांसाठी बनवण्यात आले. त्या पूर्वी " Eastern Christian " चर्च द्वारा फादर ख्रिसमस या नावाने हे पात्र काही सेंट लोकांनी साकारले होते.
या फादर ख्रिसमसचा वेष हा बिशपचा (हिंदी चित्रपटात दाखवलेल्या फादर सारखा) असे. परंतु जेंव्हा हा सांता क्लोज जगभरात प्रसिद्ध करायचे ठरले तेंव्हा, त्याला धार्मिक वेशभूषेची अडचण नको म्हणून आधी एखाद्या डच खलाश्या सारखा, हिरवा हिवाळी कोट असा वेष ठरला.
कालांतराने जेंव्हा ख्रिसमस हा सणच जागतिक करायचा ठरला तेंव्हा आत्ताच्या सांता क्लोजचा वेष त्याला मिळाला असे दिसते. हा झाला सांता क्लोजचा ढोबळ इतिहास. आता याचा उद्देश्य काय ते पाहू.
ज्या अर्थी हे कपोल कल्पित पात्र आहे त्या अर्थी याचा येशू ख्रिस्ताशी काहीच संबंध नाही.
ख्रिसमस हा सण जास्तीत जास्त प्रमाणात साजरा करायला लावून, त्यातून ख्रिश्चानिटीचा प्रसार करणे हाच उद्देश त्यामागे दिसतो.
भारतामध्ये हा सण अर्थातच इंग्रज, डच यांच्या पांढऱ्या पायाबरोबरच आला आणि हळू हळू देशातील प्रमुख सणांमध्ये स्थान मिळवून बसला.
याचा प्रभाव इतका आहे की; मध्यंतरी हिंदी चित्रपटात एखादा सीन चर्च मधला नक्की असायचा. नायकाचे पात्र हिंदू, नायिकेचे पात्र हिंदू आणि अडचणीच्या वेळी प्रार्थना चर्च मध्ये ? हा नेमका कशाचा प्रकार आहे ?
ठीक आहे, हा सण साजरा करणे हा ख्रिश्चन नागरिकांचा कायदेशीर हक्क आहे, पण हिंदू समाजाला एवढा सांता प्रिय का असावा ?
त्यातूनही आपल्या मुलांना लाल टोप्या खालून त्यांचा जोकर करणारी हिंदू मंडळी ही अशिक्षित नाहीत तर,
सुशिक्षित ? आणि उच्चभ्रू समाजातील जास्त प्रमाणात असतात याचे आश्चर्य वाटते.
हिंदूनो ! तुम्ही तुमच्या मुलांचे सारे हट्ट पुरवता ना ? मग त्यांना उगाच कपोल कल्पित सांता क्लॉजचे वेड का लावता ?
स्वतः च्या मुलांचे संगोपन ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही ती पारही पडताय तर मग तो उपरा सांता क्लोज कशासाठी हवा ?
लक्षात ठेवा, आई-बाबा हेच खरे नाताळ बाबा आणि दुर्दैवाने ज्यांचे आई बाबा नाहीत अश्यासाठी भोलेनाथ बाबा हेच नाताळ बाबा.
हिंदूंच्या या आणि पुढच्या पिढीचे वैचारिक धर्मांतरण करण्याचा डाव म्हणजे हे पाश्चिमात्य सणांचे अवडंबर होय !
आज आपण खरेदी करत असलेली १०-२० रुपयाची सांता टोपी ही उद्याच्या बाप्तिस्माची तयारी ठरू नये हीच इच्छा.
जाता जाता आणखी एक प्रश्न पडतो की :
एकी कडे प्रभू रामचंद्रांच्या जन्माचे दाखले मागणारी कथित फेक्युलर बांडगुळे सांता क्लोज चे कुळ सांगतील का ?
विश्व हिंदू परिषद - बजरंग दल सिंहगड भाग.
Comments
Post a Comment