बजरंग दलाच्या रक्तदान महायज्ञात ९१५ पिशव्यांचे संकलन.


।। जय श्रीराम ।।


पुणे: ०५-१२-२०२१. 


विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, सीमेवरील हुतात्मा सैनिक, हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू आणि कारगिल विजय दिनाच्या स्मरणार्थ  आयोजित, " भव्य रक्तदान महायज्ञ " उत्साहात पार पडला. 

जगताप शाळा हिंगणे, आनंद मारुती मंदिर आनंद नगर, कै. रमेश वांजळे जलतरण तलाव, सनसिटी सोसायटी,

अनुश्री हॉल माणिकबाग, भैरवनाथ मंदिर वडगाव बु., राजयोग सोसायटी, नांदेड गांव, पोकळे शाळा धायरी, भिडेवाडी, भैरवनाथ मंदिर नऱ्हे. 

अश्या ११ ठिकाणी एकाच वेळी रक्तदान महायज्ञ संपन्न झाला. या मध्ये ९१५ पिशव्यांचे संकलन करण्यात आले. 

सकाळी ९:०० ते दु. ३:०० पर्यंत सुरु असणाऱ्या उपक्रमात रक्तदान करण्याकरता, रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रत्येक केंद्रावर रक्तदात्यांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. 

सदर महायज्ञ म्हणजे, एका प्रकारे मनुष्यसेवेचा उत्सवच आहे असे मत रक्तदात्यांनी मांडत, या उपक्रमात सहभागी करून घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले. 

या प्रसंगी, रा. स्व. संघाचे श्री. धनंजय काळे, श्री. मंगेश पाटील, श्री. अभय ठकार, विश्व हिंदू परिषदेचे मा. दादा वेदक, श्री. किशोरभाऊ चव्हाण, श्री. मनोहर ओक, श्री. प्रदीप वाजे, श्री. दिनेश लाड, श्री. धनंजय गायकवाड, गरुडझेप संस्थेचे श्री. अशोक सरपाटील, भोई प्रतिष्ठानचे श्री. मिलिंद भोई, हिंदवी स्वराज्य संघाचे श्री. रणजीत नातू, आमदार माधुरी ताई मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी विविध केंद्रांना भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. 

पुणे शहरामध्ये रक्ताचा तुडवडा भासत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होणे ही बाब महत्वाची आहे, असे मत सहभागी रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी मांडले. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता, १०० हुन अधिक गणेश मंडळे, विविध हौसिंग सोसायटी, नामांकित सामाजिक संस्था आणि विश्व हिंदू परिषदेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवून परिश्रम घेतले. 

समाजाची बांधिलकी जपणारा, उपक्रम एवढ्या भव्य प्रमाणात आयोजित केल्याबद्दल, आयोजकांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

द्वारा : प्रचार विभाग, विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग.

Comments

Popular posts from this blog

आई-बाबा हेच नाताळ बाबा

हिजाबचे झाले पण हर्षा बजरंगीच्या हत्येचे काय ?

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.