महापरिनिर्वाण दिना निमित्त, विनम्र अभिवादन.

 


परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता ही, मानवी आयुष्यातील एक महत्वाची घटक असते. 

बरेचजण प्रतिकूलतेपुढे हतबद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. परंतु प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतः चे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात. 

असा उद्धार करण्यासाठी विलक्षण मन:सामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते. अथक परिश्रम आणि अविश्रांत संघर्ष करणारा बाणा असल्याखेरीज संकटांवर मात करता येत नाही. 

असेच एक झुंजार, आजन्म संघर्षमय आयुष्य व्यतीत करून महामानव होण्यापर्यंतचा प्रवास करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

आयुष्यामध्ये कितीही संकटे आली, कितीही नकारात्मक परिस्थिती उद्भवली तरीही, न डगमगता, तत्वांशी तडजोड न करता आपला संघर्ष अविरतपणे सुरु ठेवण्याचा वस्तुपाठच आपणाला डॉ. आंबेडकरांच्या चरित्रातून मिळतो. 

निर्भय स्वभाव, लक्ष्य प्राप्तिकरता अविश्रांत परिश्रम, समाजासाठीची तळमळ आणि मुख्य म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपली समतोल प्रवृत्ती अबाधित राखणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे चरित्र हे केवळ भारतीयच नव्हे तर विश्वातल्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरणारे आहे. 

अमोघ वक्तृत्व, असंख्य ग्रंथांचा संग्रह आणि अभ्यास, अफाट बुद्धिमत्ता, वैश्विक विषयांचे आकलन, समाजाचे निरीक्षण, समानतेच्या निकषांवर  समाजव्यवस्थेच्या उभारणीचे चिंतन, राष्ट्रहिताचा आजन्म पुरस्कार या व अश्या अनेक  दुर्लभ सद्गुणांमुळे डॉ. आंबेडकर हे आपणांस वंदनीय ठरतात. 

आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त, विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम. 


द्वारा : समरसता विभाग, विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग. 

Comments

Popular posts from this blog

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

आई-बाबा हेच नाताळ बाबा