हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित समरसता यज्ञ.

 





श्रावणमास आणि वर्धापन दिन निमित्त विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित जप महायज्ञाला प्रचंड प्रतिसाद. 

 संकल्प पूर्ती निमित्त समरसता यज्ञ संपन्न. 

विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने श्रावण मास आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हिंगणे येथील पुरातन अश्या चक्रेश्र्वर महादेव मंदिरात ओम् नमः शिवाय या मंत्राचा सव्वा कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आला होता.

दि २६ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीत रोज सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत परिसरातील  हजारो भक्तांनी जप सेवा केली.

भक्तगण आपल्या वेळेनुसार मंदिरात उपस्थित राहून ही सेवा करत होते.

प्रत्येक श्रावणी सोमवारी, विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतीश गोरडे, तसेच रा स्व संघ सिंहगड भाग कार्यवाह मंगेश पाटील यांच्या हस्ते विशेष महाआरती करण्यात आली.

श्रावण मास समाप्ती दिनी समरसता यज्ञ संपन्न करण्यात आला. 

श्रावण अमावास्येला पहाटे ६:०० वाजले पासून या यज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. लघुरुद्र, मंदिर परिसरातील देवतांचे षोडशोपचारे पूजन आणि यज्ञ आहुती असे या समरसता यज्ञाचे स्वरूप होते.

या यज्ञाची विशेष बाब म्हणजे या यज्ञामध्ये विविध ज्ञाती मधील १०१ जोडपी एकत्रपणे आहुती देत होते.

भिन्न ज्ञाती मधील हिंदू जोडपी एकाच यज्ञकुंडात एकाच वेळी आहुती अर्पण करतात हे दृश्य विहंगम असेच होते.

हिंदू समाजातील ज्ञातीभिन्नता ही विविधता असून तो भेद नाही, अवघा हिंदू हा सहोदर ( एकाच मातेच्या उदरातून जन्मलेले) असून परस्परांमध्ये कसलाही भेद नाही, असा हिंदुत्वाचा संदेश समाजाला देणारा वस्तुपाठच या समरसता यज्ञाने घालून दिला आहे.

हिंदू समाजातील ज्ञाती ज्ञाती मध्ये परस्पर  द्वेष भावना निर्माण करण्याचे कारस्थान काही समाजकंटक करत असतात, अश्या दुष्ट शक्तींना हा समरसता यज्ञ हे उत्तर असून,

हिंदू समाजात दुफळी मजवण्याचे कोणी कितीही प्रयत्न केले तरीही विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग हिंदू ऐक्यासाठी नेहमीच कार्यरत असेल तसेच हिंदू ऐक्य साधण्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजेच समरसता यज्ञ होय, असे मत विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग अध्यक्ष श्री शरद जगताप यांनी मांडले.

या यज्ञात सहभागी होण्यासाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध मंडळे, संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

समरसता यज्ञ संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता, उपस्थित हजारो हिंदू बांधव भगिनींनी एकत्रित सहभोजन करत या महाप्रसादाचा लाभ घेतला.

सदर उपक्रम म्हणजे भेद विरहित हिंदू समाजाच्या महाशक्तीचे दर्शनच आहे अशी भावना उपस्थित मंडळींनी व्यक्त केली.

धार्मिक कार्यक्रमातून हिंदू समाजाला समरस करणारा अनोखा उपक्रम राबविल्या बद्दल विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या सर्व कार्यकर्त्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

या महायज्ञातील हिंदू ऐक्याची क्षणचित्रे पाहण्याकरता व्हिडीओ अवश्य पाहावा. 

द्वारा : प्रचार विभाग 

विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग.

Comments

Popular posts from this blog

आई-बाबा हेच नाताळ बाबा

हिजाबचे झाले पण हर्षा बजरंगीच्या हत्येचे काय ?

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.