आई-बाबा हेच नाताळ बाबा
रस्त्यावरती लाल टोप्या विकायला आलेल्या दिसल्या की ओळखावे २५ डिसेंबर जवळ आलाय. हाच तो दिवस ज्याला नाताळ, ख्रिसमस असे संबोधले जाते. येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस म्हणजे ख्रिसमस होय. आजकाल याच दिवशी कोणीतरी एक लाल कपडे आणि टोपी घालून, पांढऱ्या दाढी मिश्या वाढवलेला, गुबगुबीत कपोल कल्पित मनुष्य रात्रीतून येतो आणि लहान मुलांना खेळण्या किंवा त्या लहान मुलाच्या इच्छेनुसार काहीही देतो अशी कहाणी वर्षानुवर्षे प्रचलित आहे. तिकडे पाश्चिमात्य देशात रस्त्यांवरून असे डमी नाताळबाबा खेळण्या वाटत असतात म्हणे ! इथे पुण्यात देखील कॅम्प भागात असे प्रकार घडतात म्हणे !! अगदी लहानपणापासून ऐकत आलेला हा सांता क्लोज किंवा नाताळ बाबा म्हणजे कोण ? हा कोणात्या देवाचा अवतार ? हा प्रश्न आजच्या कथित विज्ञानवादी पिढीला पडत नाही याचेच आश्चर्य वाटते. थोडा बहुत इंटरनेटवर शोध घेतला तेंव्हा असे समजले की; हे एक पात्र (कॅरॅकटर) आहे. युरोपियन ख्रिश्चन संकल्पनेतून साकारलेले एक कपोल कल्पित पात्र . साधारणपणे १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पात्र सांता क्लोज या नावाने इंग्रजी बोलत नसणाऱ्या प्रदेशांसाठ...