Posts

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

Image
  ।। जय श्रीराम ।। पुणेः-  विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'मेळा गोभक्तांचा'  या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.  यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती  विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे संयोजक सीए महेंद्र देवी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन होणार आहे.  या कार्यक्...

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धायरीत दिपोत्सव.

Image
दि. ७ नोव्हेंबर २०२१.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धायरी येथे देशपांडे राममंदिरामध्ये, विश्व हिंदू परिषद धायरी प्रखंडाच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  धायरी येथील मते नगरमध्ये, देशपांडे कुटुंबीयांनी प्रशस्त आणि देखणे श्रीराम मंदिर उभारले आहे.  या मंदिरामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, माता सिता आणि हनुमंत याच बरोबर, गणपती तसेच मल्हारी मार्तंड (खंडोबा), यांच्या सुबक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या मंदिरामध्ये नित्य पूजा तसेच चंपाषष्ठी, श्रीराम नवमी यांसारखे धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जात असतात.  दिपावलीच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी धायरी प्रखंडच्या माध्यमातून महाआरती आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  प्रारंभी त्रिवार ओंकार, श्रीरामनामाचा  विजय मंत्र आणि श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. याच दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती, श्लोक पठण करण्यात आले. चि. अथर्व बोत्रे यांनी बासरीवादन तर कु.आराध्या गडे यांनी शंख वादन करून भक्तगणांना म...

सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.

Image
  ।। जय श्रीराम ।। पारंपरिक पद्धतीने औक्षण करताना कष्टकरी भगिनी  दि. ३१ ऑक्टॉ. २०२१, रविवार, स्थळ : धारेश्वर बँक्वेट हॉल, धायरी. : विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग यांच्या वतीने, कष्टकरी महिलांची दिवाळी गोड व्हावी याकरता  समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात आला होता.  या उपक्रमांअंतर्गत, १०१ कष्टकरी भगिनींना , फराळ बनवण्याचे साहित्य, अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे, तेल आणि साबण, त्याच प्रमाणे पणत्या आणि आकाशकंदील इ साहित्य भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात आले.  त्रिवार ओंकार आणि श्रीराम नामाचा जप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जगताप म्हणाले की;  "समाजासाठी समाजाच्या माध्यमातून राबवलेला हा एक सामाजिक उपक्रम आहे.  समाजातील अनेक मंडळींचा याला हातभार लागला आहे. " या कार्यक्रम प्रसंगी बोलताना, भाग संघचालक श्री. महेश लेले म्हणाले की;  " या उपक्रमात कोणी याचक किंवा दाता अश्या भूमिकेतून सहभागी झाले नसून, ही...

वारकऱ्यांच्या सन्मानासाठी विश्व हिंदू परिषदेचे लोकप्रतिनिधींना निवेदन !

Image
  जय श्रीराम ! विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने, पंढरपूरच्या आषाढी वारी आणि राज्यसरकारची दडपशाही याबाबत, भारतीय जनता पक्ष पुणे शहर अध्यक्ष मा. जगदीश मुळीक तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. सचिन मोरे, यांना निवेदन देण्यात आले.  वारकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करून, विश्व हिंदू परिषदेची वारकऱ्यांप्रती असणारी तळमळ, या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. खडकवासला मतदार संघाचे लोकप्रतिनिधी या भूमिकेतून सदर निवेदन विद्यमान आमदार  श्री भीमराव अण्णा तापकीर यांना देण्यात येणार होते, परंतु ते सध्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांच्या वतीने, मा. सचिन मोरे यांनी निवेदन स्वीकारले.  याबाबत चर्चा करताना, मा. श्री. जगदीश मुळीक यांनी आपले वडील देखील वि हीं प चे कार्य करायचे असे सांगत आठवणींना उजाळा दिला.  मा. जगदीश मुळीक आणि मा. सचिन मोरे यांनी, विश्व हिंदू परिषदेच्या वारकरी संप्रदायाबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेचा सन्मान केला.  विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

समंत्रक अभिषेक-पूजन करून, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा.

Image
  ।। जय श्रीराम ।। हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय...  छत्रपती शिवाजी महाराज की जय...... जय श्रीराम ..... चा अखंड जयघोष...   अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह अभिषेक करुन सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत, श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.  विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, प्रतिवर्षी हा सोहळा; किल्ले सिंहगड येथे आयोजित केला जातो. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा पुणे शहरात घेण्यात आला.  यावेळी, छत्रपती शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच, शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत, संगीत आणि वीर रसानेयुक्त असणारे, सुश्राव्य व्याख्यान झाले. ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महा...

निसर्ग संवर्धनासाठी सरसावले बजरंगी

Image
।। जय श्रीराम ।।   दि. १३-जून-२०२१ :  निसर्गाचे संवर्धन आणि विशेष करून वृक्षसंवर्धनाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.  सनातन हिंदू संस्कृती ही नेहमीच निसर्ग पूजन सांगत आली आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन, नारळी पौर्णिमेला समुद्राचे पूजन, कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे पूजन, तर मकर संक्रातीला सूर्याचे पूजन आदी सण निसर्ग पूजनाचाच संदेश देतात.  एवढेच नव्हे तर, " पादस्पर्शे क्षमस्व मे " असे म्हणत प्रातःस्मरणात या धरित्री मातेची क्षमा मागण्याचे संस्कार देखील याच संस्कृतीत केले जातात.  जगतगुरु तुकोबारायांनी तर,वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असे म्हणत, निसर्गाशी सोयरिकच जोडली आहे.  हीच संस्कृती, परंपरा पुढे चालवण्यासाठी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, स्वामी नारायण मंदिरा मागील (नऱ्हे) टेकडीवर वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन उपक्रम राबवण्यात आला.  याच टेकडीवर गेली तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या, झाडे लावा झाडे जगवा या संस्थेच्या माध्यमांतून हा उपक्रम घेण्यात आला.  या उपक्रमा अंतर्गत, २०० तुळसीच्या रोपांची लागवड करून वृक्ष संवर्धान...