Posts

आई-बाबा हेच नाताळ बाबा

Image
      रस्त्यावरती लाल टोप्या विकायला आलेल्या दिसल्या की ओळखावे २५ डिसेंबर जवळ आलाय.  हाच तो दिवस ज्याला नाताळ, ख्रिसमस असे संबोधले जाते. येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस म्हणजे ख्रिसमस होय. आजकाल याच दिवशी कोणीतरी एक लाल कपडे आणि टोपी घालून, पांढऱ्या दाढी मिश्या वाढवलेला, गुबगुबीत कपोल कल्पित मनुष्य रात्रीतून येतो आणि लहान मुलांना खेळण्या किंवा त्या लहान मुलाच्या इच्छेनुसार काहीही देतो अशी कहाणी वर्षानुवर्षे प्रचलित आहे. तिकडे पाश्चिमात्य देशात रस्त्यांवरून असे डमी नाताळबाबा खेळण्या वाटत असतात म्हणे ! इथे पुण्यात देखील कॅम्प भागात असे प्रकार घडतात म्हणे !! अगदी लहानपणापासून ऐकत आलेला हा सांता क्लोज किंवा नाताळ बाबा म्हणजे कोण ? हा कोणात्या देवाचा अवतार ? हा प्रश्न आजच्या कथित विज्ञानवादी पिढीला पडत नाही याचेच आश्चर्य वाटते. थोडा बहुत इंटरनेटवर  शोध घेतला तेंव्हा असे समजले की; हे एक पात्र (कॅरॅकटर) आहे. युरोपियन ख्रिश्चन संकल्पनेतून साकारलेले एक कपोल कल्पित पात्र . साधारणपणे १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पात्र सांता क्लोज या नावाने इंग्रजी बोलत नसणाऱ्या प्रदेशांसाठ...

महापरिनिर्वाण दिना निमित्त, विनम्र अभिवादन.

Image
  परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता ही, मानवी आयुष्यातील एक महत्वाची घटक असते.  बरेचजण प्रतिकूलतेपुढे हतबद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. परंतु प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतः चे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात.  असा उद्धार करण्यासाठी विलक्षण मन:सामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते. अथक परिश्रम आणि अविश्रांत संघर्ष करणारा बाणा असल्याखेरीज संकटांवर मात करता येत नाही.  असेच एक झुंजार, आजन्म संघर्षमय आयुष्य व्यतीत करून महामानव होण्यापर्यंतचा प्रवास करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  आयुष्यामध्ये कितीही संकटे आली, कितीही नकारात्मक परिस्थिती उद्भवली तरीही, न डगमगता, तत्वांशी तडजोड न करता आपला संघर्ष अविरतपणे सुरु ठेवण्याचा वस्तुपाठच आपणाला डॉ. आंबेडकरांच्या चरित्रातून मिळतो.  निर्भय स्वभाव, लक्ष्य प्राप्तिकरता अविश्रांत परिश्रम, समाजासाठीची तळमळ आणि मुख्य म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपली समतोल प्रवृत्ती अबाधित राखणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे चरित्र हे केवळ भ...

बजरंग दलाच्या रक्तदान महायज्ञात ९१५ पिशव्यांचे संकलन.

Image
।। जय श्रीराम ।। पुणे: ०५-१२-२०२१.  विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, सीमेवरील हुतात्मा सैनिक, हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू आणि कारगिल विजय दिनाच्या स्मरणार्थ  आयोजित, " भव्य रक्तदान महायज्ञ " उत्साहात पार पडला.  जगताप शाळा हिंगणे, आनंद मारुती मंदिर आनंद नगर, कै. रमेश वांजळे जलतरण तलाव, सनसिटी सोसायटी, अनुश्री हॉल माणिकबाग, भैरवनाथ मंदिर वडगाव बु., राजयोग सोसायटी, नांदेड गांव, पोकळे शाळा धायरी, भिडेवाडी, भैरवनाथ मंदिर नऱ्हे.  अश्या ११ ठिकाणी एकाच वेळी रक्तदान महायज्ञ संपन्न झाला. या मध्ये ९१५ पिशव्यांचे संकलन करण्यात आले.  सकाळी ९:०० ते दु. ३:०० पर्यंत सुरु असणाऱ्या उपक्रमात रक्तदान करण्याकरता, रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रत्येक केंद्रावर रक्तदात्यांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.  सदर महायज्ञ म्हणजे, एका प्रकारे मनुष्यसेवेचा उत्सवच आहे असे मत रक्तदात्यांनी मांडत, या उपक्रमात सहभागी करून घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले.  या प्रसंगी, रा. स्व. संघाचे श्री. धनंजय काळे, श्री. मंगेश पाटील, श्री. अभय ठकार, विश्व हिंदू परिषदेच...

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

Image
  ।। जय श्रीराम ।। विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.  यंदाही रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी, सकाळी ९ : ०० ते ३:०० पर्यंत, एकूण ११ रक्तदान केंद्रावर हे शिबीर संपन्न होणार आहे.  हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू, सिमेवरील हुतात्मा सैनिक आणि शौर्य दिनाच्या स्मरणार्थ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत असते.  रक्तदान महायज्ञ केंद्र, पत्ते आणि संपर्क क्र.  ################################################################################# केंद्र : 1.   हिंगणे  पत्ता : कै.हनुमंतराव जगताप प्रशाला (मनपा) हिंगणे खुर्द, पुणे-५१ संपर्क : महेश चिलमे : 8669697070 , निलेश निवळकर : 9371020365 ################################################################################## केंद्र :2.  आनंद नगर  पत्ता : आनंद मारुती मंदिर, आनंद नगर, सिंहगड रस्ता पुणे.  संपर्क :- केतन घोडके : 9921111116, सर्वेश नातू : 9922016999 ###########################################################################...

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

Image
  ।। जय श्रीराम ।। पुणेः-  विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांततर्फे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी 'मेळा गोभक्तांचा'  या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये सुंपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे गोप्रेमी, गोपालक, गोरक्षक, सहभागी होणार आहेत.  यानिमित्त आदर्श गोभक्त, आदर्श गोपालक, आदर्श गोशाळा चालक, आदर्श गोरक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती  विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रमुख माधव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि गोभक्त मेळाव्याचे संयोजक सीए महेंद्र देवी आणि विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन होणार आहे.  या कार्यक्...

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धायरीत दिपोत्सव.

Image
दि. ७ नोव्हेंबर २०२१.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धायरी येथे देशपांडे राममंदिरामध्ये, विश्व हिंदू परिषद धायरी प्रखंडाच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  धायरी येथील मते नगरमध्ये, देशपांडे कुटुंबीयांनी प्रशस्त आणि देखणे श्रीराम मंदिर उभारले आहे.  या मंदिरामध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, माता सिता आणि हनुमंत याच बरोबर, गणपती तसेच मल्हारी मार्तंड (खंडोबा), यांच्या सुबक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या मंदिरामध्ये नित्य पूजा तसेच चंपाषष्ठी, श्रीराम नवमी यांसारखे धार्मिक उत्सव उत्साहात साजरे केले जात असतात.  दिपावलीच्या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी धायरी प्रखंडच्या माध्यमातून महाआरती आणि दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  प्रारंभी त्रिवार ओंकार, श्रीरामनामाचा  विजय मंत्र आणि श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. याच दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती, श्लोक पठण करण्यात आले. चि. अथर्व बोत्रे यांनी बासरीवादन तर कु.आराध्या गडे यांनी शंख वादन करून भक्तगणांना म...

सिंहगड भागात समरसता भाऊबीज उत्साहात संपन्न.

Image
  ।। जय श्रीराम ।। पारंपरिक पद्धतीने औक्षण करताना कष्टकरी भगिनी  दि. ३१ ऑक्टॉ. २०२१, रविवार, स्थळ : धारेश्वर बँक्वेट हॉल, धायरी. : विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग यांच्या वतीने, कष्टकरी महिलांची दिवाळी गोड व्हावी याकरता  समरसता भाऊबीज हा उपक्रम राबवण्यात आला होता.  या उपक्रमांअंतर्गत, १०१ कष्टकरी भगिनींना , फराळ बनवण्याचे साहित्य, अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे, तेल आणि साबण, त्याच प्रमाणे पणत्या आणि आकाशकंदील इ साहित्य भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्यात आले.  त्रिवार ओंकार आणि श्रीराम नामाचा जप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष श्री. शरद जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकामध्ये जगताप म्हणाले की;  "समाजासाठी समाजाच्या माध्यमातून राबवलेला हा एक सामाजिक उपक्रम आहे.  समाजातील अनेक मंडळींचा याला हातभार लागला आहे. " या कार्यक्रम प्रसंगी बोलताना, भाग संघचालक श्री. महेश लेले म्हणाले की;  " या उपक्रमात कोणी याचक किंवा दाता अश्या भूमिकेतून सहभागी झाले नसून, ही...