हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित समरसता यज्ञ.
श्रावणमास आणि वर्धापन दिन निमित्त विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग आयोजित जप महायज्ञाला प्रचंड प्रतिसाद. संकल्प पूर्ती निमित्त समरसता यज्ञ संपन्न. विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाच्या वतीने श्रावण मास आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हिंगणे येथील पुरातन अश्या चक्रेश्र्वर महादेव मंदिरात ओम् नमः शिवाय या मंत्राचा सव्वा कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आला होता. दि २६ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीत रोज सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत परिसरातील हजारो भक्तांनी जप सेवा केली. भक्तगण आपल्या वेळेनुसार मंदिरात उपस्थित राहून ही सेवा करत होते. प्रत्येक श्रावणी सोमवारी, विश्व हिंदू परिषद प. महा. प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतीश गोरडे, तसेच रा स्व संघ सिंहगड भाग कार्यवाह मंगेश पाटील यांच्या हस्ते विशेष महाआरती करण्यात आली. श्रावण मास समाप्ती दिनी समरसता यज्ञ संपन्न करण्यात आला. श्रावण अमावास्येला पहाटे ६:०० वाजले पासून या यज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. लघुरुद्र, मंदिर परिसरातील देवतांचे षोडशोपचारे पूजन आणि यज्ञ आह...